पानगळ सुरु झाली आहे !!

हाडे गोठवणारी  थंडी सुरु झाली आहे नुकतीच 
हलक्या फुलक्या  पिसासारखा बर्फ भुभुर्तोय 
कधीचा!!
हाडाची सापळे दिसावी अशी 
झाडे दिसू लागली आहेत 
पोपटी गर्द श्रीमंती हरवून गेली आहे स्वप्नात ...
झाडाच्या फाद्यावर रोग पडावा तशी 
दिसू लागलीत ही  झाडे 
कुठे दूर उडून गेलीय ही पक्ष्याची जमात ??
आपली  पिलावळ घेऊन  उबदार प्रदेशात 
सातासमुद्रापलीकडे... माझ्या देशात  !!
चर्चच्या क्रुसावर  पण बर्फ जमलाय 
आणि मेंदानातील  हिरवळ गायब झाली आहे 
राखेसारखा बर्फ पसरला  आहे सर्वदूर ....!
क्षितिजापर्यंत !!
सर्वत्र खिन्न प्रकाश 
ओघळत असतो तना -मनात 
मी आपला ह्या बंदिस्त लाकडी घरात 
विजेची शेकोटी पेटवून 
माझ्या गावाच्या आठवणी काढत बसलेला !!
कोवळे कोवळे उन खात माझ्या 
शेताच्या बांधावर 
माझ्या शेतातील   पोपटी सौदर्य 
आठवीत स्वप्नात ....!!