आसवांना पंख यावे

दूर गगनी हिंडण्याला आसवांना पंख यावे
एकट्या पक्ष्याप्रमाणे दुःख माझे ही उडावे

सूर घ्यावा वेदनेने, अन व्यथेने ताल द्यावा
मैफलीमध्ये अश्या तू गीत माझे ऐकवावे

शिरशिरी यावी हवेतुन घेवुनी आभास काही
चांदण्या पाहून वाटे आठवांना आठवावे

दाटले आहेत काही नभ तिच्या माझ्यात होते
प्रीत मझ्यातील फुलाया लाख अश्रू कोसळावे

शेवटी बुडलोच मीही पाहुनी लाखो किनारे
मी कुणाला दोष देऊ खेळ दैवाचे असावे

-------------------स्नेहदर्शन