काढला संग्रह कवितांचा -

(चाल: ’ कानडा राजा पंढरीचा ’)

कोणालाही नाही कळला, खर्च फार याचा
              काढला संग्रह कवितांचा ।१।

मेजावर तो विक्रीस सत्वर
कसा पकडला असा ढीग वर
कुपन ठेविले खास प्रतींवर
         खप ना चार प्रतींचा ।२।

परमभाग्य हे नात्यांसाठी
उभे ठाकले फुकटे पाठी
उभा राहिला जमाव सावध
         जणु की शोकसभेचा ।३।

हा गझलेचा शेर वाचतो
तो चारोळ्यासवे हायकुतो‌
अभंगोविचा हा रसिकात्मा
        वाली ना कवितांचा ।४।
    ---------------
(टीप:
हायकुतो=हायकू लिहितो,
 अभंगोविचा=अभंग नि ओवीचा)