..टाळू

लाडात नेहमी का मीच भाळू
स्वार्थात लागली हातीच वाळू

प्रेमांध सागरा साठीच वाळू

नाठाळ बेरकी नातीच गाळू
लोण्यात माखले सारेच टाळू
संधीच आयती का मीच टाळू
 
का शंख शिंपले हा भेद पाळू
वाळूस लागलो हा मीच चाळू
मेंदूत पेटत्या वातीच माळू
वातीत सर्व त्या जातीच जाळू