कोळी

चला म्हटल जळमट काढूयात आज

झाडून घर स्वच्छ करूयात आज

म्हणून प्रवेश केला घरात

तेव्हा समजल अरे माझ घर माझ

थोडच उरलय सगळच तर त्या कोळ्यानी व्यापलय

सोडून मग सुस्कारा

बसून राहिलो दारा

म्हटल जालीम उपाय करायला हवा

डोकावून पाहिल थोडस आत

कोळी मग्न होता कामात

म्हटल करायला हवा आता निधार

नाहीतर या घराशिवाय कुणाचा आहे आधार

म्हणून घेतली काठी

लागलो कोळ्याच्या पाठी

म्हटल याला माराव आधी

जळमट मग आपोआप साफ होतील

केली कितीतरी वार

पण कोळी झाला नाही ठार

दमून मग बसलो कोपऱ्याशी

तेव्हा जाणवल अंधार जरा जास्तच

बिलगलाय  घराशी

तेव्हा कळल आपण आपल्या घराची

दार अगदी घट्ट बंद करून ठेवली होती

कुणी डोकवू ठोठवू नये यासाठी

औषधालाही माणस ठेवली नव्ह्ती

जाणवल तेव्हा दार उघडली सगळी

पाहिल तर कोळी नाहीसा झाला होता

त्याच्या सगळ्या पसाऱ्यानिशी