सचिन तू माणूसच लय भारी !!!

सचिन तू माणूसच लय भारी!!!
चालत राहूदे क्रिकेट जगतातली अशीच तुझी स्वारी,
घरात असलास की तू काटकसरी,
पण मैदानात उतरलास की मारतोस नेहमीच उंच भरारी,
तुझ्यातच आहे का रे ३३ कोटी देवांची शक्ती सारी?
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || १ ||
जेव्हा पण कोणी टिकास्त्र सोडून म्हणाले संपली आता सचिनची पारी,
तेव्हा तेव्हा आपल्या ब्रह्मास्त्राने उत्तरं दिलीत प्यारी,
नंतर तेच म्हणतात आम्ही मानतो सचिनचे आभारी,
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || २ ||
तुझी नव्वदित आऊट होण्याची मालिका संपवलीस बरी,
नाहीतर आमच्या हृदयाचे ठोकेच ९४ वर सिक्सर मारी,
पण तुझी शतक ठोकण्याची स्टाइलच निराळी,
तुझ्या प्रत्येक शतकावर सगळेजण आपले दु:ख विसरी,
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || ३ ||
आंतर्राष्ट्रीय क्रिकेट जगतात तुझी प्रत्येक धाव रेकॉर्ड करी,
पण तरीही अपेक्षा की कधी बनशील १०० शतकांचा मानकरी?
क्रिकेट जगतात तू एकच कसा रे चमत्कारी!
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || ४ ||
भारत रत्न तू आहेसच ह्याची प्रत्येकाला खात्री,
सरांची पदवी दिली तुला जशी लागताच धावांची लॉट्री,
देवच आहेस तू नेहमी राहील तुझ्या डोक्यावर मायेची छत्री,
शेन वॉर्न सुद्धा म्हणतो सचिन माझ्या स्वप्नात प्रत्येक रात्री,
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || ५ ||
सचिन तुझी सुद्धा मनातली एकच इच्छा अधुरी,
कधी येईल तुझ्या कारकीर्दीत विश्वचषक आपल्या घरी?
पण मी म्हणतो विश्वचषक थोडीच आहे तुझ्या महानतेपेक्षा भारी,
क्रिकेट जगात कोणीही नाही करू शकत तुझ्याशी सरासरी,
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || ६ ||
२०० अनाथ मुलांचा तूच भलंकरी,
त्यांच्या मध्यात जाऊन तू सुद्धा बनतोस शाळकरी,
आपल्या चांगुळपणाचा भाव तू त्यांच्यात सुद्धा पसरी,
तूच त्यांची आई आणि तूच त्यांची भाकरी,
सचिन तू माणूसच लय भारी!!! ---- || ७ ||
देव सुद्धा म्हणतो मी सचिनची सारी करामत पाहिली,
त्याच्या यशाची यादी लिहून संपली आमची डायरी,
देव सुद्धा रांगेत उभे मिळेल कधी तुझी स्वाक्षरी?
सचिनच्या आयुष्यात वाटी येऊ दे फक्त यशाची पायरी,
हिच आमची ईश्वर चरणी मनसोक्त इच्छा आखरी,
सचिन तू माणूसच लय भारी...!!! ---- || ८ ||
- यशपाल पाटील (९९७००११८३९)