का कळेना घडते सारे अनपेक्षित,
मन असते एक अनोख्या धुंदीत,
सारे असूनी मी वेगळ्याच तंद्रीत ,
भावना अनावर नेते ओढ लावीत,
का कळेना घडते सारे अनपेक्षित...
चाहूल नवी मना घाबरवत,
डोळे मिटूनी मना शांत करत,
गोंधळ विचारांचा उगा मना रडवत,
काव्य सुचे मग अशा अवस्थेत,
का कळेना घडते सारे अनपेक्षित..