आधार

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा,
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात विरून जावा...

वाळू दाबताच मुठीतून अलगद निसटून जाई,
काही ना उरले हाती तरी अश्रू संपत नाही,
गळून जाईल हा रुतू अशी आशाही शिल्लक नाही,
काय हवे या मनास अजूनही उमगत नाही

डोळ्यांच्या ओल्या कडा शून्यात पाहत राही,
एकल्या मनाने मी दिवस ढकलत राही,
शाश्वती ना या मनाला उगाचच जगत राही,
काय हवे या मनास अजून उमगत नाही...

(या कवितेतील सुरुवात एका गाण्याची आहे, त्याचवरून मला पुढची कविता सुचली)