आपली माय असते तोवर प्रेमाचा झरा आटत नाही
गर्द राईच्या सावलीत उन्हाच्या झळा पोचत नाही
आपल्या दुःखात तिचं सांत्वन जगावेगळी उभारी देतं
भल्या भल्या संकटांत गोवर्धन पर्वताचं छत्र होतं
आपल्या रुसवा व रागाचं तिला काही नवं नसतं
नऊ महिने नऊदिवसात तिने सारं जाणलेलच असतं
काळीज बनून ती नेहमीच पिलासाठी धडधडत असते
पंखात बळ आल्यावर तिची पिलांना कदर नसते
तरीही, दुधावरची साय ती आपल्यासाठी झाकून ठेवते
कारण तिचं जगणं केवळ माय म्हणूनच असते.