ती माझी वाट पाहते हेच मला बघायचयं
खोटं का होईना पण तिच्यावर रुसायचयं
येता जाता तिला पाहता घालमेल होते खरी
अंतरीचे ओठी येतांना शब्द अडकतात माझ्या उरी
तिच्या संगे हसावे बोलावे हा विचार करतो जेव्हा
नजरा नजर झाल्यावर पुरता बावरतो मी तेव्हा
काय करावे सुचत नाही रात्रीला झोप येत नाही
लोकं म्हणतात येडा झाला याचं काही खरं नाही
तिचं हसणं चांदणं बनून माझ्या अंगणी उतरेल का?
दिवसा उजेडी माझे चाचपडणे तेव्हा तरी थांबेल का?