फक्त क्रिकेट...

आता वाटतंय खरंच सुरू झाला आहे फीवर क्रिकेट...
रात्री स्वप्नात दिसले तर फक्त क्रिकेट...
सकाळी उठून TV वर पाहिले तर फक्त क्रिकेट...
प्तत्येक वृत्तपत्राच्या हेडलाईन वर वाचले तर फक्त क्रिकेट...
देवाकडे प्रार्थनेत मागितले तर फक्त क्रिकेट...
घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखातून ऐकले तर फक्त क्रिकेट...
छोट्यांच्या खेळात रंगले तर फक्त क्रिकेट...
मार्केटच्या उतार चढावात आले तर फक्त क्रिकेट...
बाहेर पोस्टर्स मध्ये अवतरले तर फक्त क्रिकेट...
बाजारात प्रत्येक वस्तू वर छापण्यात आले तर फक्त क्रिकेट...
मिठाईच्या आकारात आढळले तर फक्त क्रिकेट...
ऑफिसच्या tea time मध्ये discuss झाले तर फक्त क्रिकेट...
ऑफिसमधून घरी परतायचंय लवकर कारण बघायचंय LIVE क्रिकेट...
ट्रेनच्या गर्दीत कानात भिणभिणले तर फक्त  क्रिकेट...
सायंकाळी मित्रांच्या गप्पांमध्ये रंगले तर फक्त क्रिकेट...
सास बहुचे कार्यक्रम बंद झाले त्याचे कारण फक्त क्रिकेट...
Weekends ला प्रत्येक movie ची  पडली विकेट!!! कारण फक्त क्रिकेट...
वेड आहे की छंद??? सगळ्यांच्या अंगात अवतरलाय फक्त क्रिकेट...
देवाकडे एकच मागणे... पाडू नकोस ह्या काळात कोणाची विकेट...
बघूदे सगळ्यांनाच आनंदाने हा महासंग्राम क्रिकेट...
बहरूदे सगळ्यांच्या आयुष्यात हा महासंग्राम क्रिकेट...
- यशपाल पाटील (९९७००११८३९)