आभाळ चांदण्याचे ज्यांना बहाल केले
त्यांनीच हाय; मजला आता हालाल केले
वाटा श्रमात ज्याच्या धावून मी उचलला
समजून गैर मजला त्यांनी हमाल केले
देण्यास न्याय ज्यांना लढले कितीक वेळा
मिळताच न्याय त्यांना सारे जहाल झाले
खोटाच आव आणुन त्यांनी दिला दिलासा
येताच वेळ माझी सारे दलाल झाले