"सुखाचे पैलतीर"
माझ्या सदराला भोके पहा पडली ॥
" कशी गरीबाची थट्टा आज मांडली"२॥ध्रु॥
मुकाट्याने खात होतो," भाजी आणि भाकरी"२।
गुण्यागोविंदाने शेतात "करीत होतो चाकरी"२॥
या महागाईने कंबर माझी मोडली ॥ध्रु॥१॥
सरकारी योजनांचा "सुळसुळाट भारी"२।
लाभ ना मिळे कोणा "कागदावर सारी"२॥
कोणी नसे यासी वाचा फोडली॥ध्रु॥२॥
धाव तू देवा आता "करी दैन्य दूर"२।
दिसू दे आम्हा आता "सुखी पैलतीर"२
मनोभावे तुजला हात जोडली॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
४\३\२०११.