दिवस अन् रात्र, एक संपला की दुसरी येते
रात्री दिवस अन् दिवसा रात्र
नकळत गायब होते.
भेट होते दोघांची , ती वेळ साऱ्यांच्या ओळखीची
वेडी होतात दोन मन्
"कातरवेळ" ती प्रेमाची
*** *** *** ***
वाटे मला असेही, कधी तूही दिसावी
नाही तो माझा हक्क तरी,
थोडी बिलगून बसावी.
वाटे मला असेही, माझी स्वप्न तू लिहावी
जाणीवेने त्या सुखाच्या, तूही चिंब भिजावी.
*** *** *** ***
तुझं रुप पाहण्याच्या नादात
स्वतःला सावरणं राहूनच गेलं,
थोडं तुझ्यासोबतही जगायचंय म्हणून
अर्धा श्वास घेणं राहूनच गेलं.
*** *** *** ***