फ़कीर

फाटकी  लुंगी  ठीगळाचा  झबा
बिचारा फकीर रस्त्यात ऊभा //ध्रु//
अल्लाचा पुकारा करतो खरा
चौफेर माणूसकीचा आटलेला झरा
हीन-दीन बनून शोधतो गाभा
बिचारा फकीर..............//१//
भल्यामोठ्या झोळीत तुटपुंजी  भिक्षा
वीतभर पोटासाठी आयुष्यभर शिक्षा
सुखाचे चांदणे नसे त्याच्या नभा 
बिचारा फकीर..............//२//
ऊन -वारा पावसात अनवानी फिरतो
नमाजाच्या वेळा मात्र अचूक पाळतो
त्याच्या देवाची मशिदीतच शोभा
बिचारा फकीर..............//३//
सरकार, समाजाने त्यालाही पाहावे
फकीराच्या याचनेला मनावर घ्यावे
कैवारीचा आव आणत गाजवू नका सभा
बिचारा फकीर..............//४//