आहे आकाश निरभ्र
नाही कशाचीच कमी,
का कुणास ठाऊक नेहमी
स्वतःला बजावत असतो मी.
सुर्यही उगवतो अन तसाच चंद्र
सभोवताली नितळ वारे,
रात्र ही घेऊन चमचम तारे
जग हे अवघे निश्चिंत सारे.
आता भवताली सुखाचा समुद्र
हातात माझ्या सर्व सुत्रे,
जाते मिळत जे जे हवे ते
कमी कशाची कधीच नसते.
पण कधी चमकते काही शुभ्र
पाऊस जरासा जातो कोसळून,
झुळूक गारवा जातो जवळून
मनात जाते काही चमकून.
अन गडबडती सारे यमक
खोल हृदयातून येते कळ,
ओलावते जखम तीच पून्हा
यत्किंचित मी तुझ्याविना.
***