धुके

अस्पस्त मी..

स्पस्त तेवढे, डाग माझे

दिसलो तुला जरी समोर मी.

दाखले तेवढे, माग माझे

एकसंध  वाटलो जरी

जोडलेले निव्वळ  भाग माझे.

भासती  उतुंग जरी

निव्वळ पोकळ, शब्द माझे

वाटाड्या वाटलो जरी 

एक चकवा, धुके माझे.