" दिसते माझी आई"
चिमण्या बाळा भरवते जेव्हा चिऊताई ।
तेव्हा मला तिच्यामध्ये "दिसते माझी आई"॥ध्रु॥
काटयाकुटया जमवून बांधी जेव्हा घरटे।
करीती चिवचिवाट तिची पिले गोमटे॥
चिवचवाटांनी त्या घर दणाणून जाई।
तेव्हा चिवचिवाटात "दिसते माझी आई"॥१॥ध्रु॥
पंखाना बळ देऊन उडणे शिकवते।
एके दिवशी पिलू तिचे दूर उडून जाते॥
विरहात पिल्लांच्या उदास होवून जाई।
तेव्हा मला विरहात"दिसते माझी आई"॥२॥ध्रु॥
अनंत खोंडे.
२२।४।२०११.