मी आता कोठून आणू
रंगित गंधित नाजुक फुले
उतारावरी आज असती
केवळ उग्र गवती तुरे
त्या तुऱ्यांचा गंध आता
नाही जरी भाववेडा
टाकून ती निराशेने
का जगावे रुक्षतेने
आयुष्य आता घट्ट रुजले
वादळांशी भांडून सजले
हे मनोरे आणि मजले
स्वप्नापुरतेच बांधलेले
आता तुला का आठवावा
केसरातिल मंद गंध
जो कधी होता उशाशी
तू जरी स्वप्नात दंग
स्वप्नातुनी सत्यात आलो
समजण्या आधीच पडलो
फक्त आता साथ उरली
जिथवर आकाशा धरती भिडली