निघा आता

यार,
आठवतं का तुला?
तुझ्या लग्नानंतर पहिल्या रात्रीच्या आधी
आम्ही मित्रांनी तुला घेराओ घातला होता
आणि तू मध्ये उभा.. आत जाण्यास आतूर...(अन् आम्हाला हासू अनावर)
खूप रात्र होत आली तरी
आम्ही तुला सोडायलाच तयार नव्हतो
शेवटी तू चिडून म्हणालास
"बस्स झालं,साल्यांनो, निघा आता..!
और मुझे अकेला छोड दो.. दुल्हन के लिये!"
यार,
आज पुन्हा आम्ही मित्र
तुझ्याभोवती उभे आहोत
आणि  तू मधे...चितेवर!
खूप रात्र होत आलीय.. (अन् आम्हाला आसू अनावर)
आता असं वाटतं की
तूच म्हणशील पुन्हा
"बस्स झालं,साल्यांनो,  निघा आता..!
और मुझे अकेला छोड दो..  भगवान के लिये!"

---------------------------------------------------------------------------
(जयन्ता५२)