थोडासा विचार केलात तर तुमच्या एक गोष्ट लक्ष्यात येईल...
की... आपलं हे आयुष्य फक्त,
तीन कोनांच्या कोनाड्यात कोंडलेलं असतं ।
जसं भूत आणि भविष्या मध्ये,
हे वर्तमान घुसमटत असतं ।
ह्या तिघां मध्ये चालू असतो एक अजबच खेळ...
वर्तमान धावत असतो जणू,
भविष्यास त्या गाठण्या साठी ।
पण भूत अडवून धरतो त्यास...,
भविष्यात त्याने ह्याला विसरूनये ह्यासाठी ।
पुढे-पुढे जरा जास्तच रंगत जातो हा खेळ...
वर्तमान जातो थकून,
धावता-धावता त्या भाविष्या कडे ।
मग भूत येऊन म्हणतो त्यास...,
थकला असशील तर.. येउन जा थोडावेळ माझ्या कडे ।
आयुष्यभर असाच खेळला जात असतो हा खेळ...
वर्तमान गाठतोय.. तोवर ते भविष्य,
बरंच लांब निघून गेलेलं असतं ।
आणि पाठीमागे राहिल्या त्या भूताचं मात्र,
दिवसेन-दिवस वय हे... वाढतंच असतं ।
थोडक्यात काय.. ह्या तिघां मधला व कधीही न संपणारा असतो हा खेळ...
कारण.. त्या भविष्यास ह्या वर्तमानाला,
काहिलेल्या गाठता येत नाही ।
कितीही थकला तरी वर्तमान काही,
त्याच्या मागे धावणं थांबवत नाही ।
आणि भूत देखील वर्तमानाची पाठ ही कधीच,
सहजा-सहजी तरी सोडत नाही ।
ह्या साऱ्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्ष्यात आली का?...
हे तिघे तीन नाहीत, हा तो एकच आहे ।
वर्तमानात असलेला तोच, त्या भविष्यात येणारा एक वर्तमान आहे ।
आणि ओलांडून गेल्यावर भविष्यास, मागे उरला तोच तो भूत आहे ।
म्हणजेच.. ह्या तिनही भूमिका बजावणारा, एकमेव तो काळ आहे ।
हर्षद अ. प्रभुदेसाई.....