वास्तव...?

वास्तव...?

इंद्रधनुचे रंग रेखण्या येथ जाहले कुणी सज्ज
तलम झुळुक वार्‍याची हाती तरल प्रतिभेची समज

सागरतळ शोधित कुणी गेले गगनभरार्‍या मारी कुणी
सरस्वतीचा आशिष कोणा प्रासादिक इतुकी वाणी

निसर्गातले कुतुहल कोणा समाजमन शोधे कोणी
वैश्विकतेशी नाळ जोडण्या उत्सुकसे झाले कोणी

कौतुक वाटे प्रतिभेचे अन् कलागुणादी सकलांचे
वास्तव नजरेआड न होते पाय सकळचि मातीचे
..........................पाय परि ते मातीचे