अनुभव

अनुभव

कळे काय कोणा । शब्देची तो अश्व ।
उंचाऊनी पुच्छ । धावता पाहे ॥

सुगंध सुगंध । वदोनी ना कळे ।
तत्काळचि वोळे । गंधिता चाफा ॥

गोडी ते न कळे । उच्चारे साखर ।
शब्द तो उधार । अनुभव साच ॥