रितेपण......
पडक्या भिंती उरल्या नुसत्या
दरवाजे निखळून गेले
छप्पर जरी का नावापुरते
जागोजाग उसवलेले
संपून गेले घरपण अवघे
रितेरितेपण भरले ते
उदासवारा कोंदून राही
साकळले क्षण जेथ तिथे
संगीत-गाणे विरून गेले
विराणी ना कुणी आळवते
बेतालाचा अंमल सगळा
स्मशानशांती वस्तीस असे