ऐनपंचविशीत गाढवी देखील परी वाटते ,
कधीकधी तर नंतरही खात्रीपूर्वक तसेच वाटते १
वाढत्या वयात परीच्या लाथा जेव्हा खाऊ लागतो
तेव्हा परी देखील गाढवीच असते असा समज होऊ लागतो २
सुरुवातीस निदान आपले ब्रह्मचर्य तरी शाबूत असते
नंतर मात्र गाढवीसकट सर्व काही गेलेले असते ३
परी काय अन गाढवी काय तसा आपला संबंध दोघींशीही नसतो
पण तसे वाटण्याचा काळ मात्र खरा असतो ४
पंचविशीत गाढवीला परी समजणारे आपण पन्नाशीत भानावर येतो
तेव्हा थोडे लक्षात येते पंचविशी काय अन पन्नाशी काय
खरे गाढव आपणच असतो ! खरे गाढव आपणच असतो !!