गोवरी

एका एका दिवसाची गोवरी

जळून जाते संध्याकाळी
राख करत राहाते चमचम
रात्रभर !
एक एक आयुष्य 
गोवऱ्यांवर चढतं
नाती करत राहातात वणवण
जन्मभर !