अस का होत .. .. .. ?
बदलत्या मौसमासोबत भावना का बदलतात्
जश्या पडणाऱ्या पावसासोबत
भरलेल्या जख़मा पुन्हा ओल्या होतात्
.. .. ..
अस का होत .. .. .. ?
जे आपल्याला हव असत्
तेच का आपल नसत्
का जे आपल नसत्
तेच आपल्याला हव असत्
.. .. ..
अस का होत .. .. .. ?
विचारांत तू नसतानाही तूझीच स्वप्ने पडतात्
माहित आहे तू माझी नाहिस्
तरिही तू माझीच असल्याचे भास होतात्
अस का होत .. .. .. ?
इतर वेळेस साठवणीतल्या आठवणी तूला विसरतात्
आणि नेमक्या कवितेच्या वेळेसच्
मला त्या अलगद स्मरतात्
अस का होत .. .. .. ?
खरच मला शब्द सुचतात्
कि "अव्यक्त" त्या भावना
अव्यक्तपणे कागदवरती उतरतात्
.. .. .. अव्यक्त .. .. ..