मन पाऊस झाले.....

आकाशातील मळभाने मन थुई थुई नाचू लागले,
ऋतूराजाच्या आगमनाने खूपच भारावून गेले,
गरजणाय्रा प्रत्येक मेघाबरोबर मन चिंब भिजत होते,
कोसळणाय्रा सगळ्याच सरींमध्ये प्रेम उतू चालले होते....

आयुष्यही   सध्या त्यांच्या मिलनाचेच गीतं गात आहे,
बरसणाय्रा धारांबरोबर मन उंचच उंच झुले घेत आहे,
एकाकीपणाला मिलालेल्या सोबतीने पावसाच्या, तेही सुखावले आहे,
त्याच्या परत जाण्याबद्दल मात्र ते अनभिज्ञ आहे....

गरजणाय्रा मेघांनी आता शांततेचे तत्व अवलंबले,
कोसळणाय्रा सरींचेही कारंजे झाले आहे,
आंगणातील कवडस्याने पाऊस गेल्याचे पत्र पोहोचवले,
मन मात्र तो परत कधी भेटणार याचीच वाट बघत आहे....

पुन्हा एकदा नभ दाटले, अन वेडावले मन त्याच्या चाहुलीने,
यावेळी मात्र तो बरसलाच नाही, अन मेघ नुसतेच गरजले,
हरवलेल्या सुखाकडे मन नुसतेच बघत राहिले,
त्याच्या आठवणींमध्ये मन पाऊस झाले...................