" भ्रष्टाचार्याचा तोरा"
भ्रष्टाचार्या तोऱ्यात उभा का?
जा उगी जा कारागृही तू सूखी राहा ।ध्रु॥
मंत्रीपदी तू किती केले घोटाळे ।
आठवती सारे सारे धंदे तुझे काळे॥
का? आता बघशी ऍसे विस्फारून डोळे;
गुंडगिरी ही संपे आता, भोगी शिक्षा जा ॥ध्रु॥१॥
कसले आता घालणे दुसऱ्याला गंडे।
पार्श्वभागी रोज आता पडती रे दंडे ॥
नास्त्यासाठी कोठे आता मिळे तुला अंडे;
भाजी भाकरी कच्ची सारी, निमुटपणे खा जा॥ध्रु॥२॥
अनंत खोंडे.
२८।६।२०११.