पाऊस

आला आला पाऊस आला

धरती बरसे रिमझिम धारा,

सुळसुळ सुळसुळ वाहे वारा,

आला आला पाऊस आला!

पक्षी नाचती प्राणी नाचती,

नाचती पाने फुले वेली साऱ्या

आला आला पाऊस आला!

ढग झाले हे काळे कुट्ट,

दिवस बदलला हा रात्रीत,

निसर्गाचा खेळ हा सारा,

आला आला पाऊस आला!

थेंब बरसती भुमी वरती,

बेभान घेऊन वारा संगती,

दरवळला हा सुगंध सारा,

आला आला पाऊस आला!

गारा गारा म्हणती म्हणती,

मुली मुले सर्व हर्षी नाचती,

लहानग्या व चिमुरड्यांची,

भरेल आता झिम्मड शाळा,

आला आला पाऊस आला!

आजी आजोबा आई संगती,

बाबा दादा सगळे म्हणती,

गरमा गरम भजी वड्यांचा,

चला करूया बेत न्यारा,

आला आला पाऊस आला!

झाडे पाने फुले वेली,

पशू पक्षी पाखरे सारी,

मुले माणसे आणि निसर्गी,

एकी एकच हर्ष उडला,

आला आला पाऊस आला,

मनी बरसती रेशीम धारा,

आला आला पाऊस आला!!!!!!