"रामास ना निवारा"
नाही गुणास वाव, नाही खऱ्यास थारा ।
हे राज्य रावणाचे, रामास ना निवारा ॥ध्रु॥
मागेल त्यास मिळेल, म्हणे रोजगार ।
फिरता दारोदारी, मिळे तया नकार ॥
असून गुण अंगी, फिरे पाहा बिचारा ॥ध्रु॥१॥
इथे गरीबा नाही, नेसण्या वस्त्र काही।
थाट बड्यांचा पाहा, असे हो राजेशाही॥
गरीबा असे पथारी, यांना आदर्श सहारा॥ध्रु॥२॥
गुंड मोकाट फिरती, सज्जनाचे बेडी हाती।
या भ्रष्ट यंत्र्यणेने, पोखरली राज्यकर्ती॥
नेत्या आडून गुंड, कायद्यास देई गुंगारा॥ध्रु॥३॥
दामास महत्त्व भारी, रामास ना विचारी ।
अशी समाजाची ही, रीत असे न्यारी ॥
फुटेल का? कधी हा, भ्रष्टाचाराचा गुब्बारा ।।ध्रु॥४॥
येण्यास रामराज्य, सज्जनांनी यावे पुढती।
तेव्हाच थांबेल या, देशाची अधोगती॥
हे शक्य होई सारे, विसरून भेद सारा॥ध्रु॥५॥
अनंत खोंडे.
१३।७।२०११.