" आजची सूनबाई"
अग अग सूनबाई ,
त्याला कोठे तू गं नेई।
आज नवरा जो तुझा,
कधी माझा लेक होई॥ध्रु॥
त्याच्या आवडी निवडी,
असे कशात गं गोडी।
ठावे आज सारे मला,
जीव कुठे गं गुंतला॥
ओढ लागे आता त्यासी,
तुझी सदोदित बाई॥ध्रु॥१॥
अती गरिबी वाढला,
मोठा शिकवून केला।
देईल साथ आम्हाला,
वृद्धपणी जगण्याला॥
तुझ्या भोवताली पिंगा,
सदा घालीत तो राही॥ध्रु॥२॥
आता म्हातारपणात,
हवी तुमची संगत।
दिला तुम्ही गं आधार,
तर! आम्ही टिकणार॥
याचा करी गं विचार,
दूर कोठे ना तू जाई॥ध्रु॥।३॥
अनंत खोंडे.
१।८।२०११.