चांगलीच तू मी नसल्यावरही वाग
रोज तो झोकात नाकावरही राग
भंडावले ह्रदयास भोचक व्रणांनी
विसावला नवा कपाळावरही डाग
पायास भ्रमराच्या लपेटले पराग
त्या जन्मदात्या फुलावरही राग
पेटला मांडव सात्विक विचारांचा
फुलारली तेंव्हा माडीवरही बाग
अस्ताव्यस्त अवडंबर पारंब्याचे
आठवणींचा ना पारावरही माग