मुक्त मी

आज तोडुनी बंध सारे
मी अशी धाऊनि  आले
तू तुझ्या दुनियेत आता
लाव सारी पुष्पे पताका

का तुझ्या डोळ्यात पाणी
का तुझ्या ओठी विराणी
मी कधी पसरूनी  पंख
माया दिली तुजला गुलाबी

वाऱ्यावरचे गंध सारे
स्पर्शातले शब्द सारे
शपथा त्या जुन्याच आता
आठवू या पुन्हा नव्याने

पाहू नको उदास स्वप्ने
उधळू फुले दोन्ही हाताने
हरवून जाऊ रात्रीत सारे
खेळ मांडू नव्या दमाने