हमाल

ओझ्याच खाली जगतो
ओझ्याच खाली मरतो
हमालाहून सांगा
मी काय वेगळा तो
?

तो जगणेच रोज वाहतो
मी भावनेस रोज वाहतो
मोठा कुणा म्हणू मी
जो भेटता
सलाम करतो

कपड्यात पांढर्‍या मी
खोटी मिजास करतो
नशेत भावनांच्या
रिताच होत
जातो

खोटीच झिंग सारी
खोटीच दारू सारी
खोट्याच या जगाला
खोटीच दाद देतो.


(पूर्व प्रकाशनः मीमराठीं. नेट /६८८१)