प्रपोज

पाहता क्षणी तिला
हृद्य हरपून बसलो
भेटलो तिला पहिल्यांदा
आणि चक्क प्रेमात पडलो

जागा झाला मग माझ्यातला मजनू
दिवसाही दिसायला लागले मग जुगनू
ताला सुरात गाण्यातही होती मग ती
मित्रांमध्ये असतानाही आणि कोणी
नसताना ही होती फक्त ती

मग ठरवले सगळे सांगून टाकायचे
थेट जाऊन मनातले सर्व बोलायचे
भेटण्याची मग केली तिला विनंती
आश्चर्य म्हणजे तिने हि ती मान्य केली
तयार झालो पिरगाळून नसलेल्या मिश्या
आनंदाने मग दुमदुमल्या दाही दिशा

माझ्यातल्या माजुनला झोप नाही रात्री
ती येणार याची मात्र पटली होती खात्री
सकाळी उठून घातला नवीन सदरा
मीच मनाला सांगितलं आता नाही
कसला खतरा

जाऊन बसलो वेळेच्या आधी एक तास
आणि होत राहिले क्षणाक्षणात तिचे भास
ठरवलेल्या वेळेच्या एक तास उशिराने ती आली
नजरेने हृदयाला सांगितले मग आता
हि पोरगी पटली

दोन तास मात्र झाल्या इतर गप्पा
मी काही उघडू शकलो नाही हृदयाचा कप्पा
तिलाच समजली मग माझी भावना
हळूच गालात हसून तिनेच
बोलून दाखविल्या मग प्रेमाच्या कल्पना

मी स्तब्ध झालो
तीच वेळ तोच क्षण
सारे आसमंत शांत झाले
विश्वास बसत नव्हता
माझ्या प्रेमाला तिने स्वीकारले
मिठीत घेऊन तिला  मग मी जग विसरलो
देवाचे आभार मनात मग
तिच्याशी मनातले सारे बोललो