कान तुटक्या कपासारखे आयुष्य ..!!

कसे बेतून बेतून आयुष्य जगत असतात सारे 
कपातून चहा प्यावा तसे आयुष्य गोजिरवाणे 
कपाला कान असतो 
त्यामुळे अलगद कान पकडून चहा पिता येतो 
हात भाजत नाही 
त्यामुळे सगळे छान वाटते 
चहां गरम असेल तर थोडी निवू द्यायचा 
ईतके फक्त सोपे असते 
मग बघा मन कसे गाणे गाते 
कधी कधी कान तुटक्या कपासारखे हे आयुष्य असते 
धड हे ना धड ते असे सगळे बेचव असते 
असे फुटके तुटके आयुष्य एखाद्याच्या वाटेला येते 
अशे जगणे त्याला निव्वळ अवघड वाटते 
तो आपलेच दुख कुरवाळीत बसतो 
कोठे सहानभूतीचा कवडसा पडतोय की  काय हे शोधीत बसतो 
प्रार्थना नवस नि काय नि काय 
दयेचा एखादा थेंब ओंजळीत पडावा 
प्रार्थना करीत असतो ..
एखादा  मस्त मौला 
तुटक्या कानासारख्या आयुष्यावर देखील प्रेम करतो 
मस्तपैकी सूर लावतो 
अनुभवाचे एकएक आभाळ करतो 
सुरांची मैफिल जमवून बसतो 
हरवून जातो सुरात 
जे गाणे आपल्याला आवडते
तेच गाणे आपले असते 
बाकी असते काय ..?
आयुष्याच्या  फुलातून थेंब थेंब गोळा करीत 
मध गोळा करीत बसतो 
त्याच्या डोळ्यात बघा 
आयुष्य म्हणजे निव्वळ आनंद असतो ...!!