आठवण..

आठवण..

पश्चिमेला जेव्हा ऊन येते
तुझ्या चाहुलीची कुणकुण येते
सांजवेळी बागेच्या दाराशी
हटकून तुझी आठवण येते

चंद्र जेव्हा येतो दाराशी
योजुनी किरणांच्या आराशी
त्या तळ्यातल्या नौकेतील
आठवण तुझी मोहरून येते

जेव्हा इंद्रधनू दाखवतो वाकुल्या
पदरावर तुझ्या मोरपीस झळाळून येते
चिंब पावसात जेव्हा वीज कडाडते
आठवण तुझी निथळून येते

राजेंद्र देवी