" तोचि आवडे जनतेला"
जो लुटतो ज्याला त्याला,
तोचि आवडे जनतेला।ध्रु।
दीन बिचारा आडता कोणी।
ठगती त्याला संधी साधूनी॥
उत्सवाला जमवी वर्गणी।,
नित वसुली खंडणीला॥१॥ध्रु।
घेऊन चंबू आपुल्या हाती।
मतदानाची भीक मागती॥
निवडून येता तो मागुती।,
विसरे सर्व जनाला॥२॥ध्रु।
जनसेवेचे घेऊन बंधन।
योजनांचे करी उद्घाटन॥
कामे सारी अर्धी ठेवून।,
जमवी भ्रष्ट धनाला॥३॥ध्रु।
अनंत खोंडे
२।१।२०१२. टिपः नव वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.