माझा मी न राहिला

माझा मी न राहिला

काळ्या कुंतलात
वारा भरून राहिला
श्वासात तुझ्या
तो पण बावरला

लाजलेला गुलाब
गाली तुझ्या पाहिला
बावरलो मी
माझा मी न राहिला

डोळ्यात तुझ्या
आरसा मी पाहिला
हृदयिचा गुलाब
चरणी तुझ्या वाहिला

राजेंद्र देवी