बावन्न

बावन्न

जन्मःताच आयुष्याचा नवाकोरा कॅट
देवाने नशिबाच्या हातात दिला
नशिबाने पण मनापासून पिसले
एक एक पान उलगडून दिले

कधी दुररि तर कधि तिर्री
कघी गुलाम तर कधी राजा
सिक्वेंन्स कघी जुळला नाही
पेअर मात्र मस्त जुळली

बावन्न पाने वाटून झाली
राहिला फक्त जोकर
असेल बरोबर कोणी तर किंमत
नाहीतर झिरो बरोबर

राजेंद्र देवी