..आजही

अताशा नाहीच वाटत लाजही
प्रजा सारी कोडगी नाराज ही

कशाला खोडायचा पत्ता नवा

निनावी आहे तसा मी आजही
सुकाणूचा तोल गेला आजही
नशील्या गर्तेत रोज जहाजही
नकाशा हा संपता संपेचना
गुदमराया लागली ती गाजही
नसे कोठे नोंदणी वा तोडगा
असा कोणी दाबला आवाजही