देव वाटला- असुर निपजला !!


धर्म लाज संस्कार शरम
सोडुन बनला कसा नराधम -

फासुन व्यवसायास काळिमा 
पैसा-पैसा करसी अधमा !

अर्भक दिसले- शस्त्र उचलले  
माणुसकीचे नांव न उरले !
 
 जिरला टाहो गर्भातच तो
माउलीस ना पान्हा फुटतो -
 
स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी
कशी कळावी मातृथोरवी !
 
धन्य होतसे का तव माता -
कृष्णकृत्य तव तिजला कळता ?

म्हणेल माता नक्की तुजला,
देव वाटला- असुर निपजला !!