अभ्यासदौरा

काल प्रलय आला होता
आणि सोबत अभ्यासदौर्‍यासाठी आणलेल्या नवशिक्या वादळांना
माझे काळीज दाखवून म्हणाला
"हे नीट बघा, हा असा विध्वंस जमला पाहिजे!"

---जयन्ता५२