वाटते भीती

नेत्र हे दाटण्याची वाटते भीती
टोमणे ऐकण्याची वाटते भीती

सारखी माणसाची बाटते नीती
एकटा राहण्याची वाटते भीती

भ्रष्ट, खोटारड्यांची राजनीती ती
हो! खरे बोलण्याची वाटते भीती

चोचले जास्त झाले, व्हायची फजिती
कायदा मोडण्याची वाटते भीती

सोसले फार आता बास ही प्रीती
मीच तो आज ज्याची वाटते भीती