वय...

वय..

ते पण वय होते
आरशात सजायचे
हे पण वय आहे
आरशीत सजायचे

ते पण वय होते
चांदण्यात निजायचे
हे पण वय आहे
अंधारात कुजायचे

ते पण वय होते
पावसात भिजायचे
हे पण वय आहे
आसवात भिजायचे

राजेंद्र देवी