विश्व

तुझ्या इवल्या इवल्या हातात
शोधते बालपण मी माझे
तुझ्या काळ्याभोर डोळ्यांत
पाहते स्वप्न मी माझे

तुझ्या बोबड्या बोलण्यात
आठवते बोल मी माझे
तुझ्या गोऱ्यापान मुखड्यात
पाहते रुपडे मी माझे

तुझ्या दुडूदुडू  धावण्यांत
विसरते भान मी माझे
तुझ्या लयबद्ध श्वासात
दडले आहेत श्वास माझे
तुझ्या हातांवरील रेषांत
पाहते भविष्य मी माझे
तुझ्या गोड गोड हसण्यात
सामावले विश्व माझे
प्राची कर्वे