निरोप...

निरोप...

पाऊल माझे उचलत नाही
निरोप दे आता येते आई
परसदारिची सिंच ति वेल
रोज तयास येते सायलीचे फुल

निरोप द्या आता बाबा
कितिवेळ मनावर ठेवणार ताबा
येईल आठवण जेव्हा माझी
देवाला वहा सायलीची फुले ताजी

आठवशील तू जेव्हा मला
उघडून पाहा सायलीच्या फुला
निरोप घेते येते मी भाऊ
डब्यात ठेवला आहे आठवणींचा खाऊ

राजेंद्र देवी