एक झुळुक

एक झुळुक वाऱ्याची 

सुखावते मनाला
निरोप तुझा सजना
गुपीत सांगते कानाला
तुझ्या भेटीसाठी आज
असुसले हे मन
अनोख जग इथले
आपल्याच नादात सारे जन
इथली भयान शांतता
कधी जीवघेनी ठरते
आठवून तुला कधी
मी झोपाळा झुलवते
झोपाळ्याचे तुझे गाणे
पुटपुटते मनाशी
तु दूर गेल्याची
खंत बाळगते उराशी
तुझे शब्द ती झुळुक
हळुवार सांगते
निरोप तुझा सजना
परत तिच्या सोबत देते.