कुणाचं मन अजूनपर्यंत....

कुणाचं मन अजूनपर्यंत माझ्यावर भाळलं नाही
म्हणूनच प्रेम म्हणजे काय अजून मला कळलं नाही.

आपण सुद्धा कुणाच्या प्रेमात पडलं पाहिजे
आपलं सुद्धा कुणावर मन जडलं पाहिजे
असं कधी वाटतं ना? मनात वादळ उठतं ना?
मला सुद्धा वाटलं होतं........
आपण सुद्धा प्रेमात चिंब भिजावं
आपल्या आठवणीने कुणी रात्र-रात्र जागावं...
पण आमचं मात्र कुठेही जुळलं नाही.
म्हणूनच प्रेम म्हणजे काय अजून मला कळलं नाही.

खरं सांगतो एकदा मात्र मनात
प्रेमाचं रान उठलं होतं....
बेभान होवून प्रीतीचं
गाणं म्हटलं होतं
स्वप्नांच्या फांदीवर मन सारखं झुलत होतं
वेलीवरच्या कळीसारखं मनात प्रेम फुलत होतं
पण कस ते कळलं नाही?
सारं काही फिस्कटलं....
आमचं प्रेम फुलण्या आधी
तिनेच ते विस्कटलं....
तेव्हा पासून कुणाकडे माझं मन वळलं नाही.
म्हणूनच प्रेम म्हणजे काय अजून मला कळलं नाही.